शासन निर्णय
-
राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गांची सामाजिक व आर्थिक उन्नती व्हावी यासाठी सध्या कार्यरत असलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत विणकर समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास शासन निर्णय क्रमांक: महामं-२०२४/प्र.क्र.२४/महामंडळे दिनांक: ०४ मार्च, २०२५ अन्वये मान्यता देण्यात आली आहे.सदरचे महामंडळ “विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ (वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या उपकंपनी)” या नावाने संबोधले जाईल. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या नियंत्रणाखाली सदर उपकंपनीचे कामकाज चालविण्यात येईल.
- शासन निर्णय