बंद

    रु.१.०० लक्षपर्यंतची थेट कर्ज योजना

    • तारीख : 04/03/2025 -
    1. शासनाकडून प्राप्त भाग भांडवलातून महामंडळ ही योजना राबविते.
    2. रु.१.०० लक्ष पर्यंत थेट कर्ज उपलब्ध.
    3. लाभार्थीचा सहभाग निरंक.
    4. ४८ समान मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल रु.२,०८५/- नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज आकारण्यात येणार नाही. नियमित कर्जाची परतफेड न करणाऱ्या लाभार्थीना जेवढे कर्जाचे हप्ते थकित होतील त्या रक्कमेवर द.सा.द.से. ४% व्याज आकारण्यात येईल.


    रु.१.०० लाख थेट कर्ज योजना अर्जाचा नुमना पीडीएफ( १ एमबी)

    लाभार्थी:

    लाभार्थी हा महाराष्‍ट्र राज्‍यातील विणकर तसेच विशेष मागास प्रवर्गांमध्ये समावेश असलेला विणकर समाजातील असावा.

    फायदे:

    कर्ज रक्‍कम ४८ समान मासिक हप्‍त्‍यामध्‍ये मुद्दल रु. २,०८५/- नियमित परतफेड केल्‍यास लाभार्थींना व्‍याज आकारण्‍यात येणार नाही. परंतू नियमित परतफेड न करणा-या लाभार्थींना जेवढे कर्जाचे हप्‍ते थकीत होतील, त्‍या रक्‍कमेवर द.सा.द.से.४% व्‍याज आकारण्‍यात येईल.

    अर्ज कसा करावा

    सदर अर्ज महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात ऑफलाईन सादर करावा